क्योटो
क्योटो : जपानच्या होन्शू बेटामधील दक्षिणेकडील क्योटो विभागाची राजधानी. लोकसंख्या १४,४०,००० (१९७३). हे कामो नदीकाठी टोकिओच्या ३६८ किमी. पश्चिमेस व ओसाकाच्या ४० किमी. ईशान्येस आहे. जपानमधील पाचव्या क्रमाकांचे हे शहर ७९४ – १८६८ पर्यंत जपानची राजधानी असल्याने धर्म, शिक्षण, कला, संस्कृती, उद्योग इत्यादींचे हे अद्यापही केंद्र समजले जाते